Solar Project
sakal
धुळे: महापालिकेच्या इमारतीवर बसविलेल्या ऑन ग्रीड रुफ टॉप सोलर सिस्टिमुळे महापालिकेच्या वीजबिलात दरमहा सुमारे एक ते दीड लाख रुपये बचत होत आहे. दरम्यान, सोलर प्रोजेक्ट, महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र, गांडूळ खत प्रकल्प येथेही लवकरच सोलर सिस्टिम कार्यान्वित होईल. त्यामुळे या सर्व सौरऊर्जा वापरातून वीजबिलावर होणाऱ्या खर्चात महापालिकेला दरमहा सुमारे २५ लाख रुपये बचत अपेक्षित आहे.