धुळे -पिसाळलेल्या कुत्र्याने बालिकेवर हल्ला केल्याची घटना घडल्यावर पुन्हा एकदा शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची गंभीर समस्या अधोरेखित झाली.विविध जाचक नियमांमुळे हा प्रश्न सोडविताना महापालिका प्रशासनापुढे समस्या असल्या तरी इतर शहरांच्या तुलनेत धुळे महापालिका प्रशासन याप्रश्नी पूर्णपणे फेल ठरले आहे, असेच म्हणावे लागते. बरं केवळ मोकाट कुत्र्यांचाच प्रश्न नाही, तर महापालिकेने इतर कोणती समस्या सोडविली? या प्रश्नाचे उत्तरही महापालिका यंत्रणेला देता येणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे केवळ कोट्यवधींचे बजेट मांडून आणि रस्ते, गटारांची कामे करूनच महापालिकेला धन्यता आहे. शिवाय रस्ते, गटाराच्या कामांबाबतही कोणी बोट दाखविणार नाही, अशी स्थिती नाही.