
धुळे-महापालिकेच्या विविध विभागातील भंगार साहित्य विक्रीसाठी महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. सद्यःस्थितीत विविध विभागांचे साहित्य मिळून सुमारे ३० ते ४० लाखांचे भंगार निघेल, असा अधिकाऱ्यांना अंदाज आहे. तीन-चार वर्षांपूर्वीदेखील महापालिकेने भंगार विक्री केले होते. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या विविध विभागांकडील सुमारे ३५ गाड्याही स्क्रॅप होणार आहेत.