Solid Waste
sakal
धुळे: महापालिका क्षेत्रातून रोज संकलित होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण तथा प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेच्या सहकार्याने इंदाई रिसायक्लर्स एलएलपी ही कंपनी करीत आहे. गेल्या साधारण वर्षभरात ६० हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कचऱ्यातून निघालेले ‘आरडीएफ मटेरियल’ कंपनीतर्फे धार (मध्य प्रदेश) येथील एका सिमेंट फॅक्टरीला इंधन म्हणून पाठविले जात आहे.