Municipal Election
sakal
धुळे: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना, भारतीय जनता पक्षात काही प्रभागांतील उमेदवार निवडीवरून मोठा पेच निर्माण झाला. रिंगणातील मर्यादित ६० जागा आणि तब्बल ५५० इच्छुकांच्या रेट्यामुळे भाजपच्या कोअर कमिटीला सोमवारी दिवसभर ‘धाकधूक, वाद आणि टेन्शन’, अशा तिहेरी संघर्षाचा सामना करावा लागला. विशेषतः प्रभाग १२, १६, ११ आणि १८ मधील उमेदवारी निश्चितीवरून नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने रात्री उशिरापर्यंत यादी रखडली होती.