Dhule Municipal Election
sakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule Municipal Election : धुळ्यात पुन्हा 'कमळ' फुलले! ५० जागांसह भाजपची महापालिकेवर एकहाती सत्ता
BJP Secures 50 Seats in Dhule Municipal Corporation Elections : गेल्या निवडणुकीतही मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप ५० जागांची ‘मॅजिक फिगर’ गाठेल, असे शब्द खरे ठरवले होते. यंदा त्यांच्यासह पक्षाने ‘५५ प्लस’चा नारा दिला होता; परंतु उमेदवारी वाटपात झालेली थोडीशी चूक निकालातून नडल्याचे समोर आले.
धुळे: महापालिका निवडणुकीच्या प्रचारातील हिंदुत्वाच्या मुद्याआधारे मतांच्या ध्रुवीकरणात मिळविलेले यश आणि पुढील पाच वर्षांत सभेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने शाश्वत विकासाची ग्वाही देणाऱ्या भारतीय जनता पक्षावर पुन्हा विश्वास व्यक्त करत धुळेकरांनी ५० विजयी जागांचे दान टाकले.
