धुळे- दोन- अडीच महिन्यानंतर मनपा निवडणुकीच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होण्याची शक्यता लक्षात घेता याकामी संभाव्य खर्चास आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देतानाच येत्या महिनाभरात मतदान केंद्रांची व्यवस्था पूर्ण करा, असा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान, प्रशासकीय महासभेत डेडरगाव तलाव, एमआयडीसी तलाव संवर्धन व सुशोभिकरण, शहराची मूळ मंजूर विकास योजना सुधारित करण्यासाठी इरादा करणे, राजमाता जिजाऊ माँसाहेब (मातृतीर्थ) स्मारकासाठी जागा उपलब्ध करणे आदी विषय मंजूर करण्यात आले.