Municipal Election
sakal
धुळे: महापालिकेच्या रणधुमाळीसाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असली तरी त्यांची खरी कसोटी निवडणूक मैदानात नाही, तर कागदपत्रांच्या पूर्ततेत लागत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत तब्बल एक हजार २५४ इच्छुकांनी नामनिर्देशनपत्रे नेली आहेत; मात्र शुक्रवार (ता. २६) अखेरपर्यंत निवडणूक कार्यालयात एकही अधिकृत अर्ज दाखल झालेला नाही. कागदपत्रांचा डोंगर पार करताना इच्छुकांची होणारी दमछाक आणि राजकीय पक्षांकडून उमेदवारांची होत नसलेली घोषणा यामुळे अद्याप उमेदवारी अर्ज दाखल होण्याचे खाते निरंक आहे.