Dhule Municipal Election
sakal
धुळे: निवडणूक नसली, की पक्षासाठी सर्वकाही म्हणणारे काही नेते, पदाधिकारी प्रत्यक्ष निवडणुकीवेळी मात्र सोयीची भूमिका घेतात. धुळ्यातही विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी अशाच काहीशा सोयीच्या भूमिकेत वावरत असतानाचे चित्र दिसते. संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ते विजयी कसे होतील, यासाठी त्यांची त्या-त्या प्रभागातच कसरत सुरू आहे. पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी ते कितपत वेळ देताहेत हा प्रश्न आहे. त्यामुळे ‘कुटुंबातील सदस्य प्रथम, नंतर पक्षाचे उमेदवार’ अशी गत या मंडळींची दिसते.