Dhule Municipal Election
sakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule Municipal Election : धुळेकरांना उमेदवार आवडेनात! २१ हजार मतदारांनी दाबले 'नोटा'चे बटन
Dhule Records Lower Voter Turnout Than Previous Election : धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या मतमोजणीनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, १९ प्रभागांतील २१ हजारांहून अधिक मतदारांनी 'नोटा' पर्यायाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
धुळे: महापालिका सार्वत्रिक निवडणूकीत ५६.७३ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा या वेळी हे प्रमाण राहिले. दरम्यान, या कमी मतदानातही नोटा अर्थात ‘वरिलपैकी कुणीही नाही’ हा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्याही २१ हजारांवर राहिली हे विशेष. अर्थात त्या-त्या प्रभागातील मतदारांना रिंगणातील उमेदवार पसंत पडले नाहीत. अर्थात यातील बऱ्याच मतदारांनी चुकीने नोटाचे बटन दाबल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
