Municipal Election
sakal
धुळे: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी (ता. ३०) शेवटची मुदत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीने, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविकेने ऐनवेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि बुधवारी (ता. ३१) छाननी प्रक्रियेवेळी या दोन्ही उमेदवार बिनविरोध झाल्या. त्यांच्यासाठी ही लॉटरीच ठरली.