Dhule Municipal Election
sakal
धुळे: महापालिका निवडणुकीच्या मैदानात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान गुरुवारी (ता. १) दुपारी तीन ते शुक्रवारी (ता. २) दुपारी तीन, असे सलग २४ तास शहरात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. दोंडाईचा पालिकेचा ‘बिनविरोध पॅटर्न’ धुळ्यात राबविण्याच्या सत्ताधारी भाजपच्या प्रयत्नांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांनी तीव्र विरोध केला.