Devendra Fadnavis
sakal
धुळे: धुळे शहर हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. एकेकाळी नियोजनबद्ध शहर म्हणून ओळख असलेल्या धुळ्याकडे ७० वर्षे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, ज्यामुळे शहराची अवस्था बिकट झाली. मात्र, गेल्या निवडणुकीत धुळेकरांनी भाजपला साथ दिली आणि मी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली. आता पुन्हा एकदा विकासाची संधी द्या. येत्या पाच वर्षांत धुळ्याला देशातील एक आधुनिक शहर म्हणून नवी ओळख मिळवून देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.