Dhule Municipal Election
sakal
धुळे: महापालिका निवडणूक २०२५- २०२६ साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ३०) अपेक्षेप्रमाणे इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी उसळली. सहा निवडणूक कार्यालयांस्थळी कार्यकर्त्यांची जत्रा पाहावयास मिळाली. यात १९ प्रभागांतील एकूण ७४ जागांसाठी उमेदवारी अर्ज खरेदी व स्वीकृतीच्या सहा दिवसांत तब्बल दोन हजार १०९ अर्ज विक्री झाले.