Municipal Election
sakal
धुळे: आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुती करावी, अशी सूचना भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशस्तरावरून दिली गेली आहे. त्यानुसार मित्र पक्षांकडून १९ प्रभागातील ७४ पैकी ५५ जागा भाजपला मिळाल्या, तर महायुतीस हरकत नसेल, अशी भूमिका भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.