Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : धुळे मनपाला राज्यात पाचवे, विभागात प्रथम मानांकन; पदाधिकाऱ्यांकडून कौतुक

Dhule News : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री टीबीमुक्‍त भारत अभियानात (फूड बास्केटवाटप) क्षयरुग्णांना पोषण आहार व इतर आवश्‍यक मदत उपलब्ध करण्याच्या कार्यात धुळे महापालिकेने राज्यात पाचवे, तर नाशिक विभागात पहिल्या क्रमांकाचे मानांकन मिळाले.

महापालिकेच्या या कामगिरीबद्दल मान्यवरांनी महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. (Dhule Municipal ranked 5 th in state 1 st in division in pm PM TB Free India Mission dhule news)

धुळे महापालिकेमार्फत क्षयरुग्णांना पोषण आहार व इतर अत्यावश्यक मदत देण्यासंदर्भात सातत्याने विविध स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, उद्योगसमूह, बँका व विविध संस्थांना आवाहन करण्यात आले. या अनुषंगाने धुळे महापालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या या आवाहनाला अनेक संस्था, व्यक्‍तींनी प्रतिसाद देऊन उपचार घेणाऱ्या व संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पोषण आहाराची व्यवस्था करून दिली.

सामाजिक बांधिलकीतून दिलेला हा मदतीचा हात व महापालिकेमार्फत केलेल्या कार्याचा प्रगती अहवाल लक्षात घेता पुणे येथे झालेल्या क्षयरोग राज्यस्तरीय आढावा बैठकीत टीबीमुक्‍त भारत अभियानात राज्यस्तरावर महापालिका विभागात धुळ्याला राज्यात पाचवा, तर नाशिक विभागात पहिल्या क्रमांकाचे मानांकन मिळाले. या यशस्वी कामगिरीबद्दल राज्य क्षयरोग अधिकारी डॉ. सुनीता गोल्हाईत व सहसंचालक यांनी धुळे महापालिकेचे अभिनंदन केले. या बैठकीला शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचे कौतुक

या कामगिरीसाठी महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्‍त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Dhule Municipal Corporation
NMC News : झोपडपट्टी स्वच्छतेसाठी आयुक्त मैदानात; लेखानगर झोपडपट्टीचा घेतला आढावा

या अभिनंदनीय कामगिरीमुळे धुळे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला त्याबद्दल खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, सभागृहनेते राजेश पवार, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमल पाटील, उपायुक्‍त डॉ. संगीता नांदूरकर यांनी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी व यंत्रणेचे अभिनंदन केले.

बाराशे फूड बास्केट वाटप

उपक्रमांतर्गत धुळे शहरातील ३४ निक्षयमित्र यांनी प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत सहभाग घेऊन धुळे शहरातील दत्तक घेतलेल्या क्षयरुग्णांना आतापर्यंत एक हजार २०० फूड बास्केट (पोषण आहार) वाटपासाठी मदत दिली आहे. हे मिशन क्षयरुग्णांसाठी आधार ठरत आहे. मिशन शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर क्षयरोग केंद्रातील प्रीती कुलकर्णी, शशिकांत कुवर, अनिल बागूल, प्रकाश देवरे, शाहू महाजन, रवींद्र भामरे, योगेश मोरे, प्रसाद अहिरराव यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

Dhule Municipal Corporation
World Dance Day 2023 : नृत्य क्षेत्रात नाशिकचा झेंडा अटकेपार; प्रतिभाशाली नृत्य कलावंतांमुळे ओळख!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com