World Dance Day 2023 : नृत्य क्षेत्रात नाशिकचा झेंडा अटकेपार; प्रतिभाशाली नृत्य कलावंतांमुळे ओळख!

World Dance Day 2023 Talented dance artists have brought name to international level nashik news
World Dance Day 2023 Talented dance artists have brought name to international level nashik newsesakal

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : प्रतिभाशाली नृत्य कलावंतांनी नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवले आहे. त्यांच्या कलेमुळेच नाशिकला नृत्य क्षेत्रात ओळख मिळाली असे प्रतिभावंत नृत्य कलाकार आणि नृत्य संस्थांची आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त ओळख करून देण्याचा प्रयत्न.. (World Dance Day 2023 Talented dance artists have brought name to international level nashik news)

कीर्ती भवाळकर :

रेखा नाडगौडा यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेतलेल्या कीर्ती भवाळकर यांना २००० मध्ये कथ्थक नृत्य विशारदा व २००३ मध्ये कथ्थक नृत्यालंकार प्राप्त केले. त्यांनी विविध संगीत महोत्सवामध्ये नृत्याचे सादरीकरण केले आहे.

नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव, स्वरसाधना समिती आयोजित १९ वे किशोर संगीत संमेलन, युवा संगीत महोत्सव, महागामी आयोजित गुंजन वेणू नृत्य महोत्सव, गुरू- शिष्य महोत्सव , १३ वे युवा संगीत महोत्सव अशा विविध संगीत महोत्सवामध्ये नृत्य प्रस्तुत करून रसिकांचे दाद मिळवली आहे. त्यानंतर कथ्थक नर्तिका नृत्य दिग्दर्शिका आणि गुरू म्हणून त्याचे विविध पैलू हाताळले आहेत.

आदिती नाडगौडा- पानसे:

कथ्थक नृत्यांगना आदिती नाडगौडा- पानसे कीर्ती कलामंदिर या कथ्थक नृत्य संस्थेच्या सहसंचालक आहेत. नावीन्यपूर्ण कोरिओग्राफीसाठी त्या ओळखल्या जातात. भारतातील तरुण कथ्थक नृत्यांगनांमध्ये त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच आई तथा गुरू रेखा नाडगौडा यांच्याकडे नृत्य शिक्षण सुरू केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

World Dance Day 2023 Talented dance artists have brought name to international level nashik news
Namami Goda Project : नमामि गोदा प्रकल्पात भाजी बाजाराचा अडसर; स्वतंत्र नियोजनाच्या सूचना

गंधर्व महाविद्यालय मिरज येथून कथ्थक अलंकार व मुंबई युनिव्हर्सिटी कथ्थकमध्ये त्यांनी एम. एफ. ए. ही पदोत्तर पदवी प्राप्त केली. नाशिकमध्ये कथक नृत्य विषयात शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या प्रथम नृत्यांगना आहेत. त्यांना पं. श्यामा भाटे, पं. सुरेश तळवलकर आणि पं. बिरजू महाराज या दिग्गजांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यांनी फ्रान्ससह युथ फेस्टिव्हल, लक्ष फेस्टिव्हल पुणे, नटराज पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सव, किंकिनी चित्रपट महोत्सव येथे आपली कला सादर केली आहे.

डॉ. सुमूखी अथनी :

डॉ. सुमूखी अथनी यांनी लहानपणापासून आई संजीवनी कुलकर्णी यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरवात केली. आज त्या एक प्रतिभावंत नृत्यांगना आहेत. सेंसर बोर्ड मुंबईच्या सल्लागार समितीवर दोन वर्षासाठी त्यांची नियुक्ती झाली आहे.

त्या नृत्यविशारद व अलंकार आहेत. नाशिक शहरात कथ्थक नृत्यात पीएच. डी. करणाऱ्या पहिल्या नृत्य कलाकार आहेत. त्यांनी भारत त्याचप्रमाणे भारताबाहेर अनेक ठिकाणी आपल्या नृत्याचे सादरीकरण केले आहे. त्यांना अनेक पुरस्काराचे पुरस्कार गौरवण्यात आलेले आहे.

World Dance Day 2023 Talented dance artists have brought name to international level nashik news
NMC Tax Recovery : सुटीच्या दिवशीही कर भरणा कार्यालय सुरू!

सोनाली करंदीकर :

सोनाली करंदीकर या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून प्रथम श्रेणी विशारद आहेत. एसएनडीटी विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये डिप्लोमा केला आहे. तसेच त्यांना भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. गुरू माणिक अंबिके यांच्याकडे भरतनाट्यम मध्ये प्राथमिक शिक्षण तर गुरू डॉ. सुचेता चापेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेतले.

नाशिकमध्ये गेल्या १८ वर्षे यशस्वीरीत्या नृत्याली भरतनाट्यम ॲकॅडमी त्या चालवत आहेत. तसेच यशाच्या अनेक शिखरे नृत्यालीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत वर्ल्ड कप ऑफ पोकलोरमध्ये २२ देशातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याच्या संस्थेने महाराष्ट्रात नाही तर देश विदेशातही नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत.

आर. एम. ग्रुप:

आर. एम. ग्रुप या संस्थेने लोककला महाराष्ट्रभर पोचवली. ज्येष्ठ कलाकार कैलास पाटील यांनी लोककलेच्या माध्यमातून नाशिकमध्ये अनेक ठिकाणी कलाकारांकडून लोकनृत्य सादर करून घेतले आहे.

बीवायके महाविद्यालयात स्नेहसंमेलनात त्यांनी बसवलेले नृत्य हा आकर्षणाचा विषय होता. त्यांच्या संघाने ज्या ज्या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला तेथे त्यांनी लोकनृत्यात पहिले बक्षीस मिळवलेले आहे. तसेच सचिन शिंदे डान्स ॲकॅडमी, नवीन तोलानी डान्स ॲकॅडमी, इन्होवेशन डान्स ॲकॅडमी, डी व्हायरस डान्स ॲकॅडमी अशा अनेक संस्था नाशिकमध्ये आहेत

World Dance Day 2023 Talented dance artists have brought name to international level nashik news
NMC News : झोपडपट्टी स्वच्छतेसाठी आयुक्त मैदानात; लेखानगर झोपडपट्टीचा घेतला आढावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com