धुळे- तरुणाच्या खून प्रकरणातील साक्षीदार मृत तरुणाची आई, भाऊ व मामांसह एकूण सहा साक्षीदार फितूर झाल्यावरही न्यायालयाने आरोपी तिन्ही सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धुळे शहरातील मिल परिसरातील निखिल साहेबराव पाटील या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणात न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.