Dams
sakal
धुळे: पावसाळ्यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील मोठ्या व मध्यम धरणांमध्ये समाधानकारक नव्हे, तर तुडुंब जलसाठा कायम आहे. पाटबंधारे विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार दोन्ही जिल्ह्यांतील जलसाठा तब्बल ९६.७६ टक्के क्षमतेपर्यंत झाला. सुमारे १२ धरणे १०० टक्के भरली. यामुळे रब्बी हंगाम तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.