धुळे: एप्रिल व मे २०२५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतीस मोठ्या प्रमाणावर फटका बसला. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एकूण १६ कोटी ३३ लाख ९३ हजारांच्या मदतीची घोषणा केली आहे. यासंबंधी महसूल व वन विभागाने २२ जुलैला अधिकृत आदेश जारी केला. या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यांतील एकूण १७ हजार ९५ शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत मिळणार आहे.