Agriculture News : धुळे- नंदुरबारला 18 कोटींचा निधी; ठिबक सिंचनासाठी 3 वर्षांनंतर मिळेल अनुदान

Agriculture : कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक संच बसविलेले शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत होते.
agriculture department
agriculture departmentesakal
Updated on

धुळे : कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक संच बसविलेले शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह ठिबक उद्योग क्षेत्र व विक्रेतावर्गही नाराज झाला. परिणामी, राज्याच्या कृषी विभागाने काहीअंशी अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार धुळे व नंदुरबार जिल्ह्यास एकूण १८ कोटी ४४ लाखांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. आणखी काही निधी मिळणे बाकी असेल. (Nandurbar will get Rs 18 crore subsidy for drip irrigation after 3 years )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com