साहेब, एकदा तरी बैठक काॅल करा: शेतकर्‍यांची आर्जवे

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 21 जुलै 2017

चारवेळा निवेदन व प्रत्यक्ष सांगूनही बैठक झालेली नाही. तुम्हीच सांगा. कंपनीचा विकास कसा होईल? शासनाची संकल्पना कशी साकार होईल? आता तरी बैठक घ्या

धुळे : "साहेब, एकदा तरी बैठक काॅल करा. जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनीचा माल विकायला जागा नाही. विविध अडचणी आहेत. चारवेळा निवेदन व प्रत्यक्ष सांगूनही बैठक झालेली नाही. तुम्हीच सांगा. कंपनीचा विकास कसा होईल? शासनाची संकल्पना कशी साकार होईल? आता तरी बैठक घ्या,'' अशी आर्जवे शेतकरी उत्पादक कंपनीने निवासी उपजिल्हाधिकारी अंतुर्लीकर यांना निवेदन देऊन केली. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मांडलेल्या व्यथा 
जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीचे काम भरीव आहे. शेती माल विकण्यासाठी जागा पाहिजे. वीज जोडणी मिळायला हवी. नाबार्डकडून कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे. किमान आधारभूत किंमतीने कंपनीला खते मिळायला हवीत. बिजोत्पादनासाठी महाबीजकडून बीज प्रमाणीकरण झाले पाहिजे. यासाठी एप्रिल, मे व जून महिन्यात बैठक घेण्याबाबत निवेदन दिले. जिल्हाधिकारी, आत्मा प्रकल्पाधिकारी,  महानगरपालिका आयुक्त यांची एकत्रित बैठक झाल्यास अनेक प्रश्न निकाली निघतील.

या निवेदनावर कंपनीचे जिल्हाध्यक्ष अॅड प्रकाश पाटील, उपाध्यक्ष सुधाकर बडगुजर व सचिव महेंद्र परदेशी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhule news: farmers