illegal liquor
sakal
धुळे: निजामपूर (ता. साक्री) हद्दीत परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हाणून पाडली. या कारवाईत पथकाने सहाचाकी कंटनेरसह एकूण एक कोटी ५९ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.