
Dhule Accident News : शिंदखेडा-चिमठाणे रस्त्यावर दरखेडा (ता. शिंदखेडा) फाट्याजवळ सोमवारी (ता. १९) सकाळी साडे सहाच्या सुमारास शिरपूर येथील जैन कुटुंब पौर्णिमा असल्याने बळसाणे (ता. साक्री) येथील जैनतीर्थ येथे दर्शन घेऊन कारने परत येत असताना अपघात होऊन पुढे बसलेले पीयूषकुमार हुकूमचंद जैन (वय ५१, रा. होळनांथे, ता. शिरपूर, ह.मु. भूपेंद्रनगर, करवंदनाका, शिरपूर) जागीच ठार झाले. पत्नी, मुलगा, मुलगी व कारचालक जखमी झाले. (One dead in accident near Garkheda Fata 4 people injured)