धुळे- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या धुळे विभागातून सुमारे २५५ जादा बसेस सोडण्यात आल्या. प्रत्येक आगारातून दिवस-रात्र ही वाहतूक सेवा सुरू राहिली. त्याद्वारे मिळालेल्या प्रतिसादामुळे विभागाला सरासरी दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.