खापर : अक्कलकुवा तालुकाभरातून विविध उपचारांसाठी रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात, परंतु या सर्वांना एकाच दिव्यातून जावे लागते, ते म्हणजे नोंदणी खिडकीतून १०० ते २०० रुग्ण उपचारासाठी येत असताना नोंदणीसाठी केवळ एकच कर्मचारी आहे. यामुळे रुग्णांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते.
पावसाळ्यातही तापमान ३२ डिग्रीच्या पार गेले असून अधूनमधून पावसाची हजेरी लागते व येथे डोक्यावर छप्परही नाही. यामुळे रुग्णांना उन्हात व पावसात उभे राहावे लागण्याची वेळ आली आहे. (Dhule Patients queue in sun for case papers incident in Akkalkuwa Rural Hospital)
उन्हाचा तडाखा कमी झालेला नाही, परिणामी रुग्णांची गर्दीही वाढत आहे. पूर्वी या विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) १००-१५० वर रुग्णांची नोंद व्हायची. आता ती वाढून १५० ते २०० वर गेली आहे. रुग्णांच्या इमारतीत नोंदणी खिडकी प्रवेशद्वारा शेजारी आहे. या खिडकीतून नोंदणी कार्ड दिले जाते.
परंतु येथे एकच कर्मचारी असतो. या कर्मचाऱ्याला प्रत्येक रुग्णाचे नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्याची नोंद, वयोवृद्ध असेल तर आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्रांची नोंद घ्यावी लागते. सोबतच शुल्कही घ्यावे लागते. परिणामी, एका रुग्णाला साधारण तीन ते चार मिनिटांचा वेळ लागतो. (latest marathi news)
विशेष म्हणजे जुन्या, नव्या व महिलांसाठी एकच रांग लागते. यामुळे रांग लांबत जाऊन प्रवेशद्वाराच्या पलीकडे जाते. येथे रुग्णांच्या सोयीसाठी बसायला खुर्च्या नाहीत. नोंदणी खिडकीसमोर शेड नाही. यामुळे रुग्णांना उन्हात उभे राहावे लागते.
विशेष म्हणजे, अनेक रुग्णांसोबत नातेवाईक राहत नाहीत, काही रुग्ण वयोवृद्ध असतात, काहींना समोरचे अस्पष्ट दिसते, त्या स्थितीतही त्यांना ताटकळत तासनतास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात रुग्ण उपचार घ्यायला येतात की आजारी व्हायला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.