Water accumulated on road in Namdevbapu Patil town of Valwadi area.
Water accumulated on road in Namdevbapu Patil town of Valwadi area.esakal

Dhule News : नियोजनबद्ध ते नियोजनशून्य शहर! धुळे शहराची वाटचाल; अधिकारी-अभियंत्यांचे सपशेल अपयश, रहिवाशांना त्रास

Dhule News : गेल्या दोन-तीन दिवसांपासून धुळे शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी, नाले, तलाव, प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.
Published on

Dhule News : ‘नियोजनबद्ध शहर’ अशी ओळख असलेल्या धुळे शहराची ओळख आता ‘नियोजनशून्य शहर’ अशी झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. विशेषतः नव्याने विस्तार होणाऱ्या धुळे शहरात कुठलेही नियोजन नाही. गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांची कामे शहरात झाली, सुरु आहेत, प्रस्तावित आहेत.

मात्र, ही सर्व कामे करताना अधिकारी, अभियंते सपशेल फेल ठरल्याचे दिसते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा त्यांचा हा ‘फेलपणा’ उघड केला. अशीच परिस्थिती दोन वर्षापूर्वी पाहायला मिळाली होती. त्यातून यंत्रणेने काहीच धडा घेतला नाही हेही यातून स्पष्ट होते. (Planned to unplanned city condition of dhule)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com