Dhule Police Action
sakal
धुळे: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत शनिवारी (ता. १०) मध्यरात्री मुकटी शिवारात कारवाई करत पोलिसांनी गावठी दारूची तस्करी करणाऱ्या ट्रकसह ३० लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.