Dhule Police Route March : कायदा-सुव्यवस्थेसाठी आम्ही सज्ज; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

Dhule Police Route March : निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी धुळे शहरातील आझादनगर व चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता. १४) रूट मार्च काढण्यात आला.
Police officers during a route march in Azad Nagar and Chalisgaon road police station limits in the wake of the Lok Sabha elections
Police officers during a route march in Azad Nagar and Chalisgaon road police station limits in the wake of the Lok Sabha electionsesakal

Dhule Police Route March : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी धुळे शहरातील आझादनगर व चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता. १४) रूट मार्च काढण्यात आला. (Dhule Police route march in wake of elections)

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चाळीसगाव चौफुली, भंगार बाजार, अन्सारनगर, ऐंशी फुटी रोड, तिरंगा चौक, महापालिका शाळा क्रमांक २५, ४३, ४४ मौलवी गंज, घड्याळवाली मशीद, गल्ली नंबर ५, मच्छीबाजार, भोला बाजार, चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन हद्द, वडजाई रोड, चंद्रमणी चौक, आझादनगर, भोईवाडा,

मारिया चौक, शंभर फुटी रोड, चाळीसगाव रोड आदी भागातून हा रूट मार्च काढण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दल सज्ज आहे, असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला. (latest marathi news)

Police officers during a route march in Azad Nagar and Chalisgaon road police station limits in the wake of the Lok Sabha elections
Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी समन्वय ठेवा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत बोरसे, दत्तात्रय उजे, श्री. बागूल, गोपनीय शाखेचे जितेंद्र परदेशी.

मुक्तार मन्सुरी, अविनाश पाटील, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी तसेच होमगार्ड यांचा या रूट मार्चमध्ये सहभाग होता.

Police officers during a route march in Azad Nagar and Chalisgaon road police station limits in the wake of the Lok Sabha elections
Dhule News : हद्दवाढ गावांतील कामांना 5 कोटी मंजूर : आमदार कुणाल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com