धुळे- धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या तीन तासात तपासात कौशल्य दाखवत पिंपळनेर (ता. साक्री) येथून चोरीस गेलेल्या सोयाबीन तेलासह पिक-अप वाहन, असा एकूण सात लाख आठ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत संशयिताला अटक केली..पिंपळनेर येथून हिरालाल रघुनाथ दशपुते यांच्या मालकीचे पिक-अप वाहन (एमएच १८ एए ५२५१) आणि त्यातील सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या शनिवारी (ता. २२) पहाटे साडेपाचच्या सुमारास चोरीस गेल्या. वाहनासह मालाची एकूण किंमत सात लाख आठ हजार ८०० रुपये इतकी होती. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तपास पथक कार्यरत केले. हर्शल धनगर, संदीप शिंदे, रवींद्र सोनवणे, धीरज सांगळे, राहुल देवरे, प्रतीक देसले यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. .अवघ्या तीन तासात तपास पथकाने संशयित आरिफ नूर मोहम्मद शेख (वय ३१, रा. मौलवीगंज, नॅशनल स्कूलजवळ, धुळे) याला ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. चोरी केलेल्या पिक-अप वाहनाचा त्याने बिलाडी-जापी रस्त्यावर अपघात केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून पाच लाखांचे पिक-अप वाहन व दोन लाख आठ हजार ८०० रुपयांच्या सोयाबीन खाद्यतेलाच्या टाक्या असा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.