Power Supply Cut Off : हजारावर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; धुळे विभागातर्फे 30 कोटींवर थकीत वीजबिलांची वसुली

Power Supply Cut Off : वीज महावितरण कंपनीच्या धुळे विभागातर्फे थकबाकीदार ग्राहकांविरोधात कारवाई सुरू झाली आहे. नोटीस बजावूनही थकबाकीदार ग्राहक वीजबिल भरत नसल्याने थेट वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
Power Supply Cut Off
Power Supply Cut Off esakal

धुळे : वीज महावितरण कंपनीच्या धुळे विभागातर्फे थकबाकीदार ग्राहकांविरोधात कारवाई सुरू झाली आहे. नोटीस बजावूनही थकबाकीदार ग्राहक वीजबिल भरत नसल्याने थेट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत हजारावर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यादरम्यान सुमारे ३० कोटींवर थकीत वीजबिलांची वसुली केली गेली. (Dhule Power supply cut to thousands of customers)

धुळे विभागातील कृषिपंप ग्राहकांसह घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहक मिळून ५०० कोटींच्या घरात थकबाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. महावितरण कंपनीतर्फे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला थकीत वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना आहे. या अभियानांतर्गत धुळे विभागात आतापर्यंत हजाराहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला गेला.

महावितरण कंपनीचे कर्मचारी घरोघरी वीजबिल वसुलीसाठी जात आहेत. कारवाईत मीटरमध्ये फेरफार करून, तर काही ग्राहक अन्य मार्गाने वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले. अशा ५० ग्राहकांवर वीजचोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. (latest marathi news)

Power Supply Cut Off
Dhule Tuberculosis News : वर्षभरात दीड हजारावर क्षयरुग्ण; 623 उपचाराअंती बरे

वीजबिलाची थकबाकी भरण्यासाठी यापूर्वी ग्राहकांना हप्ते पाडून दिले जात होते. या वर्षी महावितरणने ही सेवा बंद केली. थकबाकी एकरकमी ३१ मार्चपर्यंत पूर्ण भरण्याची मुदत दिली आहे. ग्राहकांना वीजबिल भरता यावे, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा सुरू असेल. जे ग्राहक थकबाकी भरणार नाहीत, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल.

थकबाकीदार ग्राहकांनी ३१ मार्चपूर्वी चालू बिल व थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन धुळे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी केले.

Power Supply Cut Off
Dhule Lok Sabha Election : धुळे, साक्रीतील उमेदवाराने साधली 'हॅट्ट्रिक'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com