धुळे- येथील महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्यासंदर्भात शास्तीपासून सूट द्यावी, सक्तीची वसुली टाळावी तसेच संपूर्ण मालमत्तांची फेरमोजणी करून मालमत्ताधारकांना सुधारित बिले देण्याचा आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे- पाटील यांना दिला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना शुक्रवारी (ता. १८) पत्र दिले. नगरविकास मंत्रालयाकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे हा धुळेकरांसाठी दिलासादायक निर्णय झाल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.