Dhule News : ग्रामसेवकास माहिती आयोगाचा ‘दणका’; माहिती देण्यास टाळाटाळ भोवली

Dhule News : ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक यांनी वेळेत माहिती अधिकारात माहिती दिली नाही म्हणून 3 हजार रुपये शास्तीच्या कारवाईचा आदेश नाशिक खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी दिला.
Right To Information
Right To Information esakal
Updated on

चिमठाणे : नवलनगर (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक यांनी वेळेत माहिती अधिकारात माहिती दिली नाही म्हणून तीन हजार रुपये शास्तीच्या (दंडात्मक) कारवाईचा आदेश नाशिक खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी दिला. माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Dhule Punitive action of 3 thousand rupees was ordered for gram sevak of gram panchayat for not giving information in time to right to information)

नवलनगर ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक संजय वाघ यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते धनराज निकम (रा. महाळपूर, ता. शिंदखेडा) यांनी ११ डिसेंबर २०१८ ला माहिती अधिकार अर्जान्वये ग्रामपंचायतीची १४ व्या वित्त आयोगाबाबत माहितीची मागणी केली होती. माहिती ३० दिवसांत न मिळाल्याने त्यांनी प्रथम अपील दाखल केले होते.

प्रथम अपिली अधिकाऱ्यांच्या आदेशानुसारदेखील माहिती न पुरविल्याने अपिलार्थी यांनी थेट नाशिक खंडपीठाच्या राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील दाखल केले होते. त्याअनुषंगाने आयोगाने २७ नोव्हेंबर २०२० ला सुनावणी घेऊन आदेश करून संबंधिताला माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम २० (१) अन्वये शास्तीची कार्यवाही का करू नये म्हणून लेखी खुलासा मागितला होता.

आयोगाच्या आदेशानुसारदेखील तत्कालीन ग्रामसेवक वाघ यांनी कुठलाही खुलासा सादर केला नव्हता. माहिती आयोगाने सर्व कागदपत्रे पाहणी करून विहित मुदतीत तसेच प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या आदेशानंतर ही माहिती पुरविली नाही. जवळजवळ आजतागायत कोणतीही माहिती पुरविली नाही. (latest marathi news)

Right To Information
Dhule Summer Heat : उष्णतेच्या लाटेच्या झळा प्रचारालाही; जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजना

म्हणून संपूर्ण परिस्थितीचा विचार करून आयोगाने ग्रामसेवक वाघ यांच्याविरुद्ध माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम २० (१) अन्वये तीन हजार रुपये शास्तीची (दंडात्मक) कार्यवाही केलेली आहे.

रक्कम धुळे पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक वाघ यांच्या वेतनातून कपात करून माहितीच्या अधिकारातील लेखाशीर्षाखाली भरणा करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी नुकताच दिला.

"राज्य माहिती आयोगाकडून शास्ती रक्कम अत्यंत कमी आहे. नियमानुसार प्रतिदिवस २५० रुपयांप्रमाणे २५ हजार रुपये करायला हवी होती. तशी कार्यवाही झालेली नाही. तसेच शास्तीची रक्कम विनाविलंब वसूल करून त्याची नोंद नियमानुसार सेवापुस्तिकेत करण्यात यावी. माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणारे कामचुकार जन माहिती अधिकाऱ्यांना शिस्तभंगाची कार्यवाही करावी. वेतनवाढ रोखून कायद्याचे महत्त्व पटवून द्यावे.' -धनराज निकम, माहिती अधिकार कार्यकर्ता, महाळपूर, ता. शिंदखेडा

Right To Information
Dhule Water Scarcity : टंचाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी, सीईओ गोताण्यात; भूजल पातळीत घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur ZP Solar Projects
Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days
Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
Marathi News Esakal
www.esakal.com