.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Dhule Crime News : एलसीबीच्या पोलिस पथकाने छापा टाकत गावठी कट्ट्याचा बेकायदेशीर सुरू खरेदी-विक्रीचा व्यवहार उधळून लावला. सुरत (गुजरात) येथील दोघे, तर शिरपूर (जि. धुळे) येथील एक, अशा तीन संशयितांना पाठलागातून अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, दुचाकी व रोकड, असा ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी (ता. ७) पहाटे ही कारवाई केली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाईचे निर्देश दिले. (purchase and sale of Gavthi pistol was blown up by lcb)