Devendra Fadanvisesakal
उत्तर महाराष्ट्र
Devendra Fadanvis Dhule Daura: काँग्रेसद्वयींनी 50 वर्षांत पाणी अडविले का? फडणवीसांचा शिंदखेड्यातील शेतकऱ्यांना आव्हानात्मक सवाल
Latest Dhule News : सत्तेतील ५० वर्षांत ‘त्यांनी’ पाणी का अडविले नाही, शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त का केले नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. १०) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर टीकेचा प्रहार केला.
सोनगीर : निवडणुकीत ‘ते’ तोंड वर करून येतात, तेव्हा त्यांना मतदारांनी विचारावे की केंद्रातील मोदी आणि महायुतीचे सरकार महाराष्ट्रात सिंचनवृद्धीसाठी पाच ते सात वर्षांतच भरीव निधी उपलब्ध करून देतात. यासंबंधी निर्णयांची परिणामकारक अंमलबजावणी करू शकतात.
मग सत्तेतील ५० वर्षांत ‘त्यांनी’ पाणी का अडविले नाही, शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त का केले नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. १०) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर टीकेचा प्रहार केला. (question of Fadnavis to farmers of Shindkheda over congress work)

