Dhule Rain Crisis: न्यहळोद येथील शेतकऱ्यांनी कपाशी पिकात सोडल्या मेंढ्या! पावसाअभावी पिके धोक्यात

Patalagat (New Path) Sheep left in Sudam Jadhav's farm
Patalagat (New Path) Sheep left in Sudam Jadhav's farmesakal

Dhule Rain Crisis : वीस ते पंचवीस दिवसांपासून पाऊस होत नसल्याने कपाशी, सोयाबीन, मका आदी पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर मेंढ्या चारायला सोडल्या. (Dhule Rain Crisis Farmers of Nyahlod left sheep in cotton crop Crops in danger due to lack of rain)

जुलैमध्ये उशिरा झालेल्या पावसाने पेरणीदेखील लांबणीवर गेल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. यात सोयाबीन, कपाशी, मका आदी पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहेत.

शेतकऱ्यांनी हातात आलेला पैसा शेतात ओतला असून, उत्पन्नाचे साधन डोळ्यासमोर दिसत नसल्याने येथील शेतकरी सुदाम जाधव यांच्या कपाशीवर मेंढ्या फिरविण्याची वेळ आली आहे.

महागडी बिजवाई, खतफवारणी व निंदणी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कधी नव्हे इतका या वर्षी निंदणीला खर्च आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Patalagat (New Path) Sheep left in Sudam Jadhav's farm
Dhule Fake Fertilizers Case: 33 विक्रेत्यांचा परवाना निलंबित

नुकताच धर्मा वाघ या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेत व पाऊस नसल्यामुळे आत्महत्या केली असून, शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, असा प्रश्न पडलेला आहे.

सर्वच पिके पावसाअभावी करपली असून, आता कितीही पाऊस झाला तरी शेतकऱ्यांची आर्थिक झळ भरून निघणार नाही. यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून अर्थसहाय्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Patalagat (New Path) Sheep left in Sudam Jadhav's farm
NMC School: विद्यामंदिर बनले मधुशाला! हुंडीवाला लेन येथील महापालिकेच्या शाळेत मद्यपींचा वावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com