धुळे- बचत गटाच्या पैशांचे कलेक्शन करणाऱ्या साक्री रोडच्या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड, टॅब लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना ‘एलसीबी’च्या पथकाने बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या फरारी तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.