
Sakri Assembly Election 2024 : आदिवासी संवर्गासाठी राखीव साक्री विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या विद्यमान आमदार मंजुळा गावित यांना पक्षाकडून बुधवारी (ता. २३) उमेदवारी जाहीर झाली. जिल्ह्यात शिवसेनेला ही एकमेव जागा मिळाली आहे.
विकासकामांचा धडाका आणि त्यात विशिष्ट कार्यकर्त्यांच्या गटाला सोबत घेऊन कामकाजाची शैली ही त्यांच्यासाठी नाराजी ओढवून घेणारी बाब ठरल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्यापुढे काँग्रेससह बंडखोरांचे कडवे आव्हान असेल. (Sakri Assembly Candidate Manjula gavit)