
पिंपळनेर/धुळे : येथील शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची किड लागल्याचे बुधवारी (ता. २३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या एका कारवाईवरून स्पष्ट झाले. साक्रीचा गटशिक्षणाधिकारी तथा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचा अधीक्षक दोन लाखांच्या लाच प्रकरणी तुरूंगात गेला.
ऑगस्टमध्ये याच पदावरील अधीक्षक मिनाक्षी गिरी ही दोन लाखांची लाच स्वीकारताना अटकेत गेली होती. दोन महिन्यात याच पदावरील आणि शिक्षण विभागातील दुसरा लाचखोर जाळ्यात सापडल्याने या विभागाच्या कारभाराप्रश्नी चिंता व्यक्त केली जात आहे. (Second briber arrested in two months)