Dhule Water Scarcity : मालपूर येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

Dhule Water Scarcity : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. ग्रामपंचायतीने सहा ठिकाणांहून पाणी उचलत गावाला पाणीपुरवठा करावा लागत आहे.
Water from three wells has to be pumped as the well in the river It is depleting. In the second photograph, water is blocked by a dam in the river bed next to a well near a tribal settlement.
Water from three wells has to be pumped as the well in the river It is depleting. In the second photograph, water is blocked by a dam in the river bed next to a well near a tribal settlement.esakal

Dhule Water Scarcity : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. ग्रामपंचायतीने सहा ठिकाणांहून पाणी उचलत गावाला पाणीपुरवठा करावा लागत आहे. तरीही पाणीटंचाईच्या संकटाला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते आहे. दरम्यान, चार दिवसांआड मिळणारे पाणी सहा दिवसांआड दिले जाईल असे नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. दहा वर्षांनंतर प्रथमच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. (Dhule Water Scarcity)

सहा ठिकाणाहून पाणीपुरवठा

गावापासून दोन किलोमीटरवर अमरावती धरण आहे. धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. धरणाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या दोन खासगी शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या तीन विहिरी अशा पाच विहिरींतून पाणीउपसा करून नाई नदीतील विहिरीत टाकले जाते. तेथून पाण्याची टाकी भरली जाते.

याशिवाय नुकतेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमरावती धरणावरून जलवाहिनी टाकली आहे. तिचे पाणी नदीपात्रात बंधारा बांधून अडविले जाते. त्याचा निचरा आदिवासी वस्तीजवळील विहिरीत होतो. असे सहा ठिकाणांहून पाणी उचलत गावाला पाणीपुरवठा ग्रामपंचायत प्रशासनाला करावा लागत आहे.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा

संभाव्य परिस्थिती पाणीटंचाईचे संकट गडद होणार आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी तुषार साळवे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यात सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जाईल, नळांना तोट्या बसविणे, अवैध नळ कनेक्शन बंद करणे, मुख्य जलवाहिनीवरील नळजोडणीचा शोध घेणे, घर बांधकामासाठी पाणी बंद करणे, स्वतः घरमालकांनी टॅंकरद्वारे पाणी आणून घराचे बांधकाम करावे, घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी वसूल करणे आदी विषयांवर चर्चा घडविली. (latest marathi news)

Water from three wells has to be pumped as the well in the river It is depleting. In the second photograph, water is blocked by a dam in the river bed next to a well near a tribal settlement.
Dhule District Collector : भूमिअभिलेख विभाग बळकटीसाठी निधी देऊ : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

अन्यथा पाणीबाणी निर्माण होणार

पंधरा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. तालुक्यातील सर्वांत मोठे गाव म्हणून ओळखले जाते. चार वर्षांपूर्वी साठ लाख रुपये निधीतून पाणीपुरवठाची योजना येथे दिली गेली होती; परंतु विहिरीला भरपूर पाणी लागले नाही. ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी दाही दिशांना पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे.

अमरावती धरणातील थोडेफार पाणी असल्याने तहान भागत आहे अन्यथा पाणीबाणी निर्माण होणार आहे. धरण भरण्यासाठी प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेची कामे पूर्ण केली पाहिजेत. त्यातूनच शिंदखेडा तालुक्यात धरणे भरली जातील. तरच कायमस्वरूपी टंचाई दूर होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Water from three wells has to be pumped as the well in the river It is depleting. In the second photograph, water is blocked by a dam in the river bed next to a well near a tribal settlement.
Dhule Lok Sabha Constituency : 'लोकसंग्राम', जनता दलामुळे काँग्रेस पक्षाचे स्वप्न धुळीस!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com