
चिमठाणे-शिंदखेडा : शेतकरी जे पिकवितात, त्याला रास्त भाव मिळालाच पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकार शेतकरीविरोधी असून, त्यांच्या धोरणांमुळेच आज बळीराजा कर्जबाजारी होत चालला आहे. हा देश बळीराजाचा आहे. एकेकाळी हा देश गहू आयात करीत होता, तो आता निर्यातदार बनला आहे. कांद्याला भाव मिळण्यासाठी निर्यातबंदी पूर्णपणे उठवायला हवी, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिंदखेडा येथे केले. (Sharad Pawar Agricultural produce must get price )