Dhule News : मेंढपाळ बांधव, मेंढ्यासह रास्ता रोको! महिला, युवतीसह चिमुकल्यांचाही सहभाग; वाहतूक ठप्प

Dhule News : आंदोलनात मेंढपाळासह महिला, युवती व चिमुकल्यांनीही सहभाग घेतला.महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली.
Shepherd brothers, shepherds with sheep, Dhangar community brothers while stopping the road to ask for various things. Tehsildar Sahebrao Sonwane, Police Inspector Harsh Vardhan Gawli in a discussion with Dhangar Samaj Sangharsh Samiti President Ramesh Sarak.
Shepherd brothers, shepherds with sheep, Dhangar community brothers while stopping the road to ask for various things. Tehsildar Sahebrao Sonwane, Police Inspector Harsh Vardhan Gawli in a discussion with Dhangar Samaj Sangharsh Samiti President Ramesh Sarak.esakal

म्हसदी : मेंढपाळ धनगर, ठेलारी समाज बांधवांनी आज सकाळी विविध मागण्यासाठी एकत्र येत गुरुवारी (ता. ४) मेंढ्या, बकऱ्यासह धुळे - सुरत राष्ट्रीय महामार्गावरील महिर फाटा (ता. साक्री) रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात मेंढपाळासह महिला, युवती व चिमुकल्यांनीही सहभाग घेतला.महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली. (Dhule Shepherd community block way with sheep Involvement)

वनजमिनीवरील होत असलेले अतिक्रमण त्वरित थांबविण्यात यावे, ठेलारी मेंढपाळ समाजाचा एनटी.क.मध्ये समावेश करण्यात यावा, ठेलारी व मेंढपाळ समाजाला आधारकार्डच्या धर्तीवर रेशनकार्ड वाटप करण्यात यावेत,मेंढपाळाना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात यावा, वाड्या - वस्तीवर स्वतंत्र रेशन दुकान देण्यात यावे, ठेलारी व मेंढपाळ समाजाचा तांडा वस्त्यांमध्ये समावेश करण्यात यावा यासह प्रलंबित मागण्यासाठी मेंढपाळ बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला.

राष्ट्रीय महामार्गावर महीर फाट्यावर धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष तथा महिरचे सरपंच रमेश सरक यांच्या नेतृत्वात आज सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन झाले. मेंढ्या, शेळ्यांसह, मेंढपाळ ठेलारी, धनगर समाजबांधव सहभागी झाले. हजारो मेंढपाळ ठेलारी, धनगर समाजबांधव आपल्या मागण्यावर ठाम होत सहभागी झाले. आंदोलनात महिला व युवतींची उपस्थिती लक्षणीय होती.

आंदोलनावर आंदोलन ठाम

धनगर, ठेलारी समाज बांधवांनी महामार्ग अडवून धरल्यामुळे वाहतूकीचा मोठा खोळंबा झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको आंदोलन थांबवावे म्हणून तालुका प्रशासनातील तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी आणि तालुका वनाधिकारी विनायक खैरनार यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (latest marathi news)

Shepherd brothers, shepherds with sheep, Dhangar community brothers while stopping the road to ask for various things. Tehsildar Sahebrao Sonwane, Police Inspector Harsh Vardhan Gawli in a discussion with Dhangar Samaj Sangharsh Samiti President Ramesh Sarak.
Nashik Malnourished Children : ग्रामीण भागात 463 बालके कुपोषित! अतिजोखमीच्या सॅम श्रेणीत 38 बालकांचा समावेश

जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः लेखी आश्वासन देत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पावित्रा आंदोलकांनी घेतला. तथापि येत्या दहा जुलैला मागण्यांसबधीत सर्व विभागांचे अधिकारी आणि जबाबदार कर्मचारी यांची साक्रीत बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी आणि तालुका वनाधिकारी विनायक खैरनार आदींनी दिल्यामुळे मेंढपाळ ठेलारी-धनगर समाज बांधवांनी आंदोलन स्थगित करीत महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.

तालुका प्रशासनाची दमछाक

दरम्यान, एक जुलैला तालुका व जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.त्यानुसार मेंढपाळ ठेलारी,धनगर समाज बांधव आपल्या पशुधनासह महिर फाट्यावर रस्त्यावर उतरल्याची बातमी कळताच तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

मात्र आंदोलकांच्या आक्रमकतेपुढे प्रशासनाला आंदोलकांची समजूत घालताना दमछाक झाली. आंदोलकांनी पूर्वसूचना न देता आंदोलन करत असल्याचे प्रशासनाने सांगितल्यावर निवेदन देते वेळी आम्ही आमची समस्या न सुटल्यास चार जुलै रोजी रास्ता रोको करू असे सांगितले होते असे आंदोलकांनी स्पष्ट केल्यावर काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला.आंदोलनामुळे महामार्गावरील वाहनांची सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

"मेंढपाळ बांधव पशुपालक असून शेळ्या मेंढ्यासाठी जंगलातील चाऱ्यावर निर्भर राहावे लागते. वन जमिनीवर अतिक्रमण होत असल्याने मेंढपाळ व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पशुधन सांभाळणे अवघड असून वर्षभरात काही महिने बाहेर राहणाऱ्या मेंढपाळाना शासकीय सुविधेसाठी यंत्रणा पूर्णतः कामास लावून ठेलारी धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा."

- रमेश सरक, जिल्हाध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समिती

Shepherd brothers, shepherds with sheep, Dhangar community brothers while stopping the road to ask for various things. Tehsildar Sahebrao Sonwane, Police Inspector Harsh Vardhan Gawli in a discussion with Dhangar Samaj Sangharsh Samiti President Ramesh Sarak.
Dhule Ladki Bahin Yojana : महिलांनी घाईगर्दी करु नये : जिल्हाधिकारी; लाडकी बहीण साठी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com