धुळे- शिंदखेडा व धुळे तालुक्यांतून ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर तसेच पाण्याचे टँकर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तीन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ११ लाख दहा हजारांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. या कारवाईत चार गुन्ह्यांचा उलगडा झाला.