धुळे- जिल्ह्यात औद्योगिक विकासाला पोषक वातावरणामुळे आणि भूखंडाच्या उपलब्धतेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नरडाणा एमआयडीसीला मोठ्या गुंतवणूकीचे `गिफ्ट` मिळण्याची शक्यता आहे. यात राज्य सरकारने ७ ऑगस्ट २०२४ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिलेल्या लॉजिस्टिक धोरणांतर्गत प्रादेशिक लॉजिस्टिक हब योजनेत धुळे- शिरपूरचा समावेश केला आहे.