Dhule News : 8 गुन्हेगारी टोळ्यांकडून राज्याची हानी; ऊर्जा प्रकल्पांचे नुकसान

Dhule : निजामपूर माळमाथा, शिवाजीनगर (ता. साक्री) भागात अडीच हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीचे पवनऊर्जा आणि सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत.
Shivajinagar Solar City Project.
Shivajinagar Solar City Project.esakal

Dhule News : निजामपूर माळमाथा, शिवाजीनगर (ता. साक्री) भागात अडीच हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीचे पवनऊर्जा आणि सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यातील किमती कॉपर केबलवर गुन्हेगारी टोळ्यांचा डोळा असतो. केबल विक्रीतून चांगला पैसा मिळत असल्याने टोळ्या वाढत गेल्या आणि त्यांच्यात स्पर्धाही निर्माण झाली. सध्या सहा ते आठ टोळ्या सक्रिय आहेत. त्या कॉपर केबलची सतत चोरी करत असल्याने राज्याची मोठी हानी होत आहे. ( State loss from 8 criminal gangs was Damage to power plants )

तरीही निजामपूर पोलिस ठाणे सुस्त कसे हा संशोधनाचा विषय ठरत आहे. दरम्यान, चार ते पाच दिवसांपूर्वी तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी लागलीच कॉपर केबल चोरी प्रकरणी कठोर पवित्रा घेत निजामपूर पोलिस ठाण्याला खडसावले आहे. त्यानंतर एका टोळीतील तिघांना अटक झाली.

पवनऊर्जा प्रकल्प

साक्री तालुक्यात सरासरी १५ ते २० वर्षांपूर्वी सुझलॉन पवनऊर्जा आणि सोलर सिटी प्रकल्प स्थापन झाला. राज्यात वीजनिर्मितीचा तुटवडा आणि जागतिक तापमानवाढीवर पर्याय म्हणून हे प्रकल्प स्थापन करण्यासाठी साक्री तालुक्याची (जि. धुळे) निवड झाली. निजामपूर माळमाथा परिसरात सुझलॉन पवनऊर्जा कंपनीने सुमारे साडेतीनशे कोटींच्या गुंतवणुकीतून १.२ मेगावॉट वीजनिर्मितीचे ३५० टॉवर उभे केले. हा प्रकल्प सरासरी ४०० ते ४५० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचा आहे. शिवाय वेस्टास कंपनीचे सरासरी ७२ मेगावॉट वीजनिर्मितीचे ६० टॉवर आहेत. -

सौरऊर्जा प्रकल्प

शिवाजीनगर भागात दोन हजार कोटींच्या निधीतील १७५ मेगावॉट वीजनिर्मितीचा महाजेनकोचा सोलर सिटी प्रकल्प आहे. याशिवाय लॅन्को सोलर, मेघा सोलर, सुझलॉन, ग्रिनको सोलर, फोर्थ पार्टनर सोलर, परम सोलर, वॅरोक सोलर असे विविध सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प आहेत. सरासरी दोन हजार एकरांवरील सौरऊर्जा प्रकल्पातून एकूण ४७७ मेगावॉटची वीजनिर्मिती होते. (latest marathi news)

Shivajinagar Solar City Project.
Dhule News : बैलांअभावी बळीराजाच्या गोठ्याचे वैभव उतरतीला; शेतकरी पारंपरिकतेऐवजी तंत्रशुद्ध शेतीकडे वळल्याचा परिणाम

या दोन्ही प्रकल्पांतून रोज सरासरी ५५ ते ६० लाख युनिट वीजनिर्मिती होते. वीजटंचाईप्रश्‍नी राज्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे. मात्र, काही पैशांसाठी गुन्हेगारी टोळ्या अशा प्रकल्पातील कॉपर केबलच्या चोरीतून राज्याची हानी करीत आहेत.

दुर्लक्ष पडले महागात

सुरवातीपासून पवन व सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प जिल्ह्यात येऊन चूक झाली की काय, अशी गंभीर स्थिती कॉपर केबल (तांब्याची तार) चोरीच्या घटनांमुळे समोर येऊ लागली. त्याकडे दुर्लक्ष करणारे तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक विजय चव्हाण यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागल्याचे सर्वश्रुत आहे. असा इतिहास असताना निजामपूर पोलिस ठाणे, साक्रीचे उपविभागीय पोलिस अधिकारी केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांबाबत गंभीर का नाहीत हा संशोधनाचा विषय आहे.

दोन प्रकल्पांमधून आतापर्यंत कोट्यवधींची कॉपर केबल चोरीस गेली आहे. या घटना सतत घडत असतानाच गेल्या वर्षभरात कॉपर केबल चोरीच्या प्रकरणात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा विकासात योगदान देणाऱ्या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ही स्थिती ना जिल्हा ना राज्यासाठी लाभदायक आहे.

Shivajinagar Solar City Project.
Dhule News : विमान पाठवून कदमबांडे यांना बोलावले; शाहू महाराजांचे वारस; मोदींच्या कोल्हापूरमधील सभेस उपस्थित

सौरऊर्जानिर्मिती अशी...

(मेगावॉट क्षमता)

वेरॉक सोलर............५

स्वरयू सोलर............२०

परम सोलर.............७२

ग्रीनको सोलर..........१००

फोर्थ पार्टनर सोलर.....१०५

महाजेनको..............१७५

पवनऊर्जानिर्मिती अशी...

(मेगावॉट क्षमता)

सुझलॉन कंपनी......४५०

वेस्टास कंपनी.........७२

Shivajinagar Solar City Project.
Dhule Crime News : सोनगीर फाट्यावर कारवाईत 5 लाखांचा गुटखा जप्त

‘नासा’मुळे धुळे जिल्ह्याच्या पदरात प्रकल्प

आशिया खंडातील सर्वांत मोठ्या सोलर सिटी प्रकल्पासाठी आवश्यक सूर्यप्रकाशाची गरज शिवाजीनगर (ता. साक्री) भागातून अधिक भागविली जाते. जगात विषुववृत्तावर ३२ फॅरेनहाइट क्षमतेची सूर्यकिरणे लळिंग (ता. धुळे) व शिवाजीनगर (ता. साक्री) भागात पुरेशा प्रमाणात मिळतात. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ‘नासा’ या संशोधन संस्थेने साक्री परिसरातील सौरकिरणांच्या रिक्लिएशन (Recliation) प्रमाणासंबंधी केलेल्या अभ्यासाच्या आधारावर या भागाची निवड झाली.

प्रकल्पात क्रिस्टलाइन फोटो व्होस्टाईक, थिन फिल्म फोटो व्होल्टाईक तंत्रज्ञानाचा वापर झाला. त्यासाठी आठ लाख २३ हजार ३१९ सौर मॉड्यूल्स (पॅनल) उभारण्यात आले. कोळशाचे मर्यादित साठे, जलविद्युत निर्मितीस भौगोलिक मर्यादा तसेच पर्यावरण रक्षणासाठी अशा प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जात आहे.

Shivajinagar Solar City Project.
Dhule Crime News : धुळे, नंदुरबार बनतेय लाचखोरांचे आगार! जिल्ह्यांना लागलीय भ्रष्टाचाराची किड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com