
नेटबॉल स्पर्धेत धुळे संघाला दुहेरी मुकुट
धुळे : बीड जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनतर्फे २२ ते २४ एप्रिल दरम्यान बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या १५ व्या राज्य ज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनच्या मुलांच्या संघाने रौप्यपदक तर मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकाविले.
मुलांच्या संघाने हिंगोली, नंदुरबार, भंडारा, चंद्रपूर या संघावर मात करून उपविजेतेपद मिळविले. संघाने रौप्यपदक व चषक प्राप्त केले. तर मुलींच्या संघाने हिंगोली, नांदेड या संघांचा पराभव करून तृतीय विजेतेपद संपादन करत कांस्यपदक व चषक प्राप्त केले.
हेही वाचा: KKR vs RR Live : संजूचे अर्धशतक; राजस्थानची शंभरी पार
मुलांचा संघ
कर्णधार-दिव्येश पाटील (पिंपळादेवी विद्यालय, मोहाडी), उपकर्णधार- अभिषेक शिंदे ( झेड. बी. पाटील महाविद्यालय धुळे), चेतन पाटील, आदित्य दहातोंडे, हर्शल चौधरी, द्वारकाधीश माळे, सनी जाधव, सिद्धेश्वर पाटील, तुषार पाटील, गौरव पाटील (सर्व पिंपळादेवी विद्यालय, मोहाडी), भविष्य वाघ (केंद्रीय विद्यालय, धुळे ), विराज पाटील (औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे), व्यवस्थापक- अविनाश वाघ, प्रशिक्षक- ऋत्विक ठाकूर.
हेही वाचा: कर्णधाराला प्रत्येकवेळी 'चमच्यानं भरवणं' शक्य होत नाही : धोनी
मुलींचा संघ
कर्णधार- गीतांजली खैरनार, उपकर्णधार- साक्षी रायगुडे, साक्षी पाटील, वैभवी खैरनार, दीपाली शिंदे, हर्षाली पाटील, वेदीका वाघ, कल्याणी चव्हाण, रोशनी पाटील, पुर्वश्री वाघ (सर्व पिंपळादेवी विद्यालय, मोहाडी), ऋतूजा आव्हाड (एसएसव्हीपीएस ज्युनिअर कॉलेज धुळे), रोशनी सूर्यवंशी ( सेंट ॲन्स इंग्लिश स्कूल, धुळे ), व्यवस्थापक- योगेश वाघ, प्रशिक्षक- शीतल वाघ. मान्यवरांकडून कौतुक राज्य नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बिपीनभाई कामदार (नागपूर) सचिव डॉ. ललित जिवानी (गोंदिया), कोशाध्यक्ष डॉ. एस्. एन. मुर्ती (वर्धा), सहसचिव श्याम देशमुख (भंडारा ), सतीश इंगळे (औरंगाबाद ), माजी नगरसेवक विनायक शिंदे, पिंपळादेवी विद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. पाटील, तालुका क्रीडा अधिकारी तथा खो-खो/कबड्डी प्रशिक्षक गुरुदत्त चव्हाण, कला व क्रीडा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष हेमंत भदाणे, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक एस. बी. पाटील, एस. डी. बाविस्कर, के आर सावंत, पर्यवेक्षक एस. एस. पाटील, वरिष्ठ लिपिक विलास बोरसे, राष्ट्रीय खो-खो सुवर्णपदकप्राप्त खेळाडू अविनाश वाघ, धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे सचिव योगेश वाघ, क्रीडा शिक्षक आर. बी.शिंदे, राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू तथा पंच ऋत्विक ठाकूर, हर्शल भदाणे, ॲथलेटिक्स प्रशिक्षक प्रमोद पाटील आदींनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
Web Title: Dhule Team Won Silver And Bronze Medals In Netball Competition In Dhule
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..