Dhule News: करवसुलीच्या आकड्याला ‘तगाद्या’ची भीती! पाणीपट्टी थकबाकीचा प्रश्‍नही गंभीर; अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज

Dhule News : मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत महापालिका यंदाही पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Dhule municipal Corporation
Dhule municipal Corporationesakal

Dhule News : मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत महापालिका यंदाही पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातही पाणीपट्टी वसुलीची स्थिती वाईट असल्याचे समजते. करवसुलीची निश्‍चित आकडेवारी द्यायला मात्र अधिकारी कचरतात. वसुलीची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर ठेकेदारांकडून बिले मागण्यासाठी तगादा सुरू होतो असा एक तर्क महापालिकेत ऐकायला मिळतो. मार्चअखेर करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थात गरज असल्यावर प्रशासनाकडूनच आकडेवारी दिली जाते. (Dhule tension tax collection figure problem of water dues)

महापालिकेचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाला दर वर्षी मोठी कसरत करावी लागते. मार्चअखेर शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प केला जातो. मात्र, ५० टक्केदेखील करवसुली होत नाही. असे चित्र दर वर्षी पाहायला मिळते. त्यामुळे महापालिकेचा शंभर टक्के करवसुलीचा संकल्प म्हणजे केवळ बोलाचा भात ठरतो.

यंदाही यापेक्षा वेगळे चित्र नाही. मालमत्ता कर, पाणीपट्टीतून यंदा किती वसुली झाली, याची निश्‍चित आकडेवारी महापालिकेकडून दिली जात नाही. अधिकारी याप्रश्‍नी टाळाटाळ करत असल्याचे पाहायला मिळते. मालमत्ता करापोटी कोट्यवधी रुपये थकबाकी आहे. मालमत्ता कराप्रमाणेच पाणीपट्टी थकबाकी वसुलीचा प्रश्‍नही तसाच गंभीर आहे.

४२ कोटी थकबाकी?

पाणीपट्टीपोटी अद्यापही तब्बल ४२ कोटी रुपये थकबाकी असल्याचे सांगितले जाते. यंदा किती पाणीपट्टी वसुली झाली याबाबतही प्रश्‍न आहे. धुळे महापालिका क्षेत्रात अर्थात हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरात ५७ हजार ९८० नळजोडण्या असल्याचे सांगितले जाते.

शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध नळजोडण्या असल्याचे वारंवार पाहायला मिळाले आहे. अधूनमधून अशा अवैध नळधारकांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारून अशा नळजोडण्या तोडण्यात आल्या व असे प्रकार निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. मात्र, नंतर याप्रश्‍नी कारवाई होताना दिसत नाही. (Latest Marathi News)

Dhule municipal Corporation
Shahada Vidhan Sabha Constituency : शहाद्याचा कौल कोणाला? राजकीय जाणकारांचे लक्ष

ठेकेदारांकडून तगादा

मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीची आकडेवारी समोर आल्यामुळे विशेषतः ठेकेदारांकडून त्यांच्या कामांची बिले मागण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे तगादा सुरू होतो असा एक तर्क काही अधिकाऱ्यांकडून लावला जातो. त्यामुळे आकडेवारी न दिलेली बरी असा सूर दिसतो. मात्र, करवसुलीची आकडेवारी ही संपूर्ण वर्षभराची असते.

अर्थात चालू आर्थिक वर्षात किती वसुली झाली याचा तो आकडा असतो. त्यामुळे आज दिलेला आकडा म्हणजे महापालिकेच्या तिजोरीत तेवढे पैसे शिल्लक आहेत असा होत नाही. सर्वसामान्य लोकांना एकवेळ ही बाब समजणार नाही पण जे नेहमी महापालिकेत असतात, ज्यांना या सर्व गोष्टी कळतात त्यांच्याकडून तगादा लागणे अनाकलनीय आहे. असा तगादा लागत असला तरी अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती का ठेवली जात नाही, असा प्रश्‍न आहे.

Dhule municipal Corporation
Dhule Wedding Ceremony : ना घोडा ना बग्गी; आमची ग्रेट बैलगाडी! बैलगाडीवरून शेतकरी वर-वधूची वरात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com