Dhule Unseasonal Rain Damage : वादळी वाऱ्याने 4 लाखांचे नुकसान; दोंडाईचा परिसरात 200 कोंबड्या मृत्युमुखी

Unseasonal Rain Damage : दोंडाईचा परिसरात १२ मेस पहाटे चार-साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
Damage to poultry farm shed.
Damage to poultry farm shed.esakal

Dhule Unseasonal Rain Damage : दोंडाईचा परिसरात १२ मेस पहाटे चार-साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. दोंडाईचा शिवारात एका पोल्ट्रीफार्मची शेड उडाली. त्यानंतर दोनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला. शेडसह चार लाखांचे नुकसान झाले. महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्याची माहिती शेतकरी आनंद माणिक यांनी दिली. ( Two hundred chickens died in Dondaicha area due to unseasonal rain )

धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह वळिवाचा पाऊस होत आहे. दोंडाईचा परिसरातही हजेरी लावली. यात मोठे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. दोंडाईचा शिवारातील मालपूर रस्त्यालगत आनंद माणिक यांचे पोल्ट्रीफार्म आहे. या फार्मला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. शेडचा पूर्ण पत्रा उडून गेला, शेडमधील कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.

Damage to poultry farm shed.
Nashik Unseasonal Rain Damage: सुरगाणा तालुक्यात अवकाळीचा तडाखा! घरांवरील पत्रे, कौल उडाली; आंबा बागांचे नुकसान

या नुकसानीचा महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. यात चार लाख ६४० एवढे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. दरम्यान, काशीनाथ पिंपळे यांच्या घरावर निमाचे झाड पडल्याने घराचे नुकसान झाले. देवीदास माकन यांच्या पोल्र्टीफार्मचेही नुकसान झाले.

''वादळी वाऱ्यामुळे माझ्या अशोक पोल्ट्रीफार्मचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्यानुसार नुकसानभरपाई मिळायला हवी.''-आनंद माणिक व प्रियंका माणिक

Damage to poultry farm shed.
Dhule Unseasonal Rain Damage : शिंदखेड्यात लिंबू, केळीची बाग भुईसपाट! वादळी वाऱ्याचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com