.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Dhule Crime News : दुचाकी चोरीच्या प्रयत्नात पोलिसांनी मुद्देमालासह पकडलेल्या संशयितांकडून पाच दुचाकी ताब्यात घेण्यात शहर पोलिसांना यश मिळाले. संशयितांनी शिरपूरसह धुळे आणि शिंदखेडा येथून दुचाकी चोरल्या असून, महागड्या दुचाकींनाच लक्ष्य करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याचे दिसून आले. अर्थे बु. (ता. शिरपूर) येथील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना संशयित पोलिसांच्या हाती लागले. (Two wheeler worth 5 lakh seized from thieves in Shirpur)