Dhule Monsoon
sakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule News : गुलाबी थंडीची वाट, पण 'पर्जन्यराजा' थांबायला तयार नाही! धुळ्यात नोव्हेंबरमध्येही पावसाळी वातावरण, नागरिक हैराण
Unseasonal Rains Continue to Drench Dhule and Maharashtra : धुळे शहरात नोव्हेंबर महिना उजाडला असला तरी गुलाबी थंडीऐवजी पावसाळी वातावरण आणि ढगाळ आकाश दिसून येत आहे. या लांबलेल्या पावसाळ्यावर सर्वसामान्य नागरिक सोशल मीडियावर गमतीशीर मीम्स बनवून आपला वैताग व्यक्त करत आहेत.
धुळे: गेल्या काही आठवड्यांपासून ‘पर्जन्यराजा’ने सर्वत्र जो काही ‘धुमाकूळ’ घातला आहे, तो थांबायचं नावच घेत नाहीये. दिवाळी, दसरा हे सण पावसाच्या साथीने साजरे करावे लागले. आता नोव्हेंबर महिना उजाडूनही गुलाबी थंडीऐवजी सर्वत्र अजूनही पावसाळी वातावरण, ढगाळ आकाश आणि अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी दिसून येत आहेत. त्यामुळे जिथे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तिथे सर्वसामान्य नागरिकही या अवकाळी पावसामुळे वैतागले आहेत.
